मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मुंढेगावलगत असलेल्या जिंदाल पॉलीफिल्म कारखान्यास बुधवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत प्लास्टिकचा कचऱ्याचा ढिगारा भस्मसात झाला. तब्बल १५ तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. कारखान्यातील खराब प्लास्टिकचा ढिगारा आगीत सापडला आणि ती आणखीन धुमसली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारखान्याच्या अग्निशमन विभागाने लगेचच आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन नाशिक अग्निशमन विभागाची मदत घेण्यात आली. रात्रभर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीने प्रयत्न करण्यात आले. १५ तासांच्या प्रयत्नानंतर ती आटोक्यात आणण्यात यश मिळाले. आगीत कारखान्यातील भंगार माल जळून खाक झाला. एकूण किती नुकसान झाले ते समजू शकले नाही. आगीचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसराची पाहणी करून खबरदारीच्या उपाययोजना केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा