चाफळपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघजाईवाडी (ता. पाटण) येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलला दुपारी तीनच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत शाळेतील संगणक संच, बँचेस, कागदपत्रे आदींसह चार वर्गखोल्या व कार्यालयीन इमारत जळून खाक झाली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आग लागल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने शाळेतील साहित्य, बेंचेस, टेबल, खुच्र्या, संगणक संच, कपाटे, गॅस टाकीसह शालेय कागदपत्रे जळून खाक झाली. याबाबतची माहिती मिळताच चाफळ पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने शाळेस सुटी असल्यामुळे अनर्थ टळला. आग विझविण्यासाठी पाटण येथील अग्निशमन दलास बोलवण्यात आले होते.
 

Story img Loader