कराडमध्ये सोमवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात बबलू माने नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, या घटनेनंतर माने यांच्या समर्थकांनी घटनास्थळी हल्लेखोरावर केलेल्या हल्ल्यात ती व्यक्ती मृत्युमुखी पडली. हल्लेखोराला लोकांनी दगडाने ठेचून ठार केले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
वैयक्तिक वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बबलू माने यांना दोन गोळ्या लागल्या असून, त्यांच्यावर सध्या कराडमध्ये उपचार सुरू आहेत.
कराडमधील मंडईजवळ सोमवारी सकाळी ही घटना घडली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेनंतर कराडमध्ये तणावाचे वातावरण असून, शहरातील पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
आणखी वाचा