नागपूरमधील कडवी चौकात बुधवारी सकाळी बांधकाम एजंट दीपक गुप्ता यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यामध्ये गुप्ता यांच्या खांद्याजवळ गोळ्या लागल्या असून, ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
गुप्ता आपल्या भावासोबत दुचाकीवरून कडवी चौकातून निघाले असताना, चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर लगेचच तिथून पळून गेले. गुप्ता यांच्या खांद्याजवळ गोळ्या लागल्या. त्यानंतर लगेचच त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचल असून, हल्लेखोरांचा तपास सुरू करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing on property dealer in nagpur