जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार २०१५ साली भारत ही मधुमेहाच्या (डायबेटीस) पेशंट्सची जगाची राजधानी होणार आहे. ५० वर्षांवरील १० पैकी ६ पेशंट मग ते कुठल्याही शहरातील किंवा खेडय़ातील आणि कुठलेही निवडले तरी डायबिटीसचेच असणार आहेत. कोकणाचीही (सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाची) परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. हा निकाल धक्कादायक आहे. या आजाराचे कारण शोधण्याची नितांत आवश्यकता आहे.
रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर रेडी या संशोधनासाठी वाहून घेतलेल्या संघटनेने शिरोडा केरवाडा, आरोंदा व रेडी ही पंचक्रोशीतील चार गावे या आजाराच्या संशोधनासाठी दत्तक घेतली आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन गुरुवार दि. १४ मार्च रोजी शिरोडा येथे जिल्हा परिषद अध्यक्षा नीकिता परब यांच्या हस्ते शिरोडकर कंपाऊंड, एस. टी. स्टँडसमोर सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे. शिरोडा ग्रामपंचायतीही या संशोधनात सहभागी होणार असून, दरगुरुवारी ५० वर्षांवरील ५० रुग्णांची मोफत तपासणी या केंद्रात केली जाईल. ब्लड प्रेशर व हृदयविकार तपासणीही त्याच वेळी केली जाईल.
आधुनिक आयुष्यातले ताणतणाव, गोड, तेलकट असा अयोग्य आहार, व्यायामाची कमतरता व दारू, तूंबाखू, सिगारेट, गुटखा ही व्यसने जरी आजाराला कारणीभूत असतील तरी शरीरात या गोष्टीमुळे बदलत असलेला महत्त्वाचा जेनिटिक फॅक्टरही याला कारणीभूत आहे. मधुमेहामुळे हृदयविकार, पॅरॅलिसिस, किडनी फेल्युअर, दृष्टीवरील परिणाम ही या आजाराची कॉम्प्लिकेशन्स आहेत. ही होऊ नयेत म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने एक मोलाचा सल्ला दिला आहे. प्रत्येक मधुमेही रुग्णाने आपल्या रक्तातील एच.बी.ए.वन.सी. (ऌुअ1उ) म्हणजे ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबीन रक्तपेशीतील मांसपेशीतील साखरेचे प्रमाण साडेसहा परसेंटपेक्षा कमी ठेवले पाहिजे. हे दर तीन महिन्याने तपासले पाहिजे. या टेस्टमुळे पेशंटचा मागील तीन महिन्यांचा मधुमेह कंट्रोल आहे का ते कळते. शिवाय उपाययोजना मग ती कुठल्याही एक्सपर्ट डॉक्टर किंवा पॅथीने (शास्त्राने) केलेली असो, ती औषधे बरोबर व योग्य डोसची आहेत की नाही हेही कळते. या टेस्टला प्रायव्हेट लॅबोरेटरीत ४०० रु. खर्च येतो. या सेंटरमार्फत प्रत्येक डायबेटीस रुग्णाची ही टेस्ट मोफत होणार आहे. जर दत्तक घेतलेल्या शिरोडा, केरवाडा, आरोंदा व रेडी या पंचक्रोशीत जर या रुग्णांचा टेस्टचा रिझल्ट साडेसहाच्या आत कायम ठेवल्यास अशा रुग्णांना डायबेटीसची कॉम्प्लिकेशन्स नगण्य होतील. हार्ट अ‍ॅटॅक, पॅरॅलिसीस, किडनी, डोळ्यांचे आजार व त्यामुळे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होण्याची प्रमाण कमालीचे घटेल असा विश्वास आमच्या ट्रस्टला वाटतो.
त्यामुळेच या ट्रस्टमार्फत असा संशोधनाचा महत्त्वाकांक्षी संकल्प हातात घेण्यात आला आहे. के.ई.एम. व टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अ‍ॅलोपथी व आयुर्वेद यांची सांगड घालून संशोधन करत असलेल्या डॉ. प्रज्ञा दाभोळकर व डॉ. नमिता धुरी या सेंटरच्या मेडिकल ऑफिसर म्हणून काम पाहणार आहेत. डॉ. विवेक रेडकर, डॉ. प्रल्हाद मणचेकर, डॉ. मांगलेकर हे स्पेशलिस्ट डॉक्टर्स आठवडय़ातून एकदा या उपक्रमात मार्गदर्शन करत आपल्या स्पेशालिटीच्या पेशंटची तपासणी करणार आहेत.
शिरोडासारख्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे डायबेटीस रिसर्च व पॉलीक्लिनिक अशा प्रकारचे हे पहिलेच रिसर्च व पॉलीक्लिनिक असून याचा पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेला नक्की फायदा होईल. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी, डॉ. पन्नीकर व भारताची इंडियन डायबेटीक असोसिएशन या संशोधन प्रकल्पाला मदत करणार असून, मधुमेहाच्या बऱ्याच रुग्णांना जीवदान देण्यात येईल, असा विश्वास रेडकर हॉस्पिटलच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader