पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत अखिल भारतीय काँग्रेस समितीने मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सहा वर्षांसाठी ही कारवाई असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रदेश काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचे नावही काढून टाकण्यात आले आहे. मात्र, संजय निरुपम यांनी वेगळाच दावा केला आहे. आधी मी राजीनामा दिला मग माझ्यावर कारवाई झाली असं ते म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस पक्षावरही टीका केली आहे.

संजय निरुपम म्हणाले, “माझ्यावर कारवाई होणार हे मला माहीत होतं. त्यामुळे मी काल (३ एप्रिल) रात्री १० वाजून ४० मिनिटांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना राजीनामा पाठवला. त्यानंतर तत्काळ माझ्यावर कारवाई करण्यात आली. राजीनाम्यातील माझे शब्द, माझ्या भावना पाहून त्यांना वाटलं असेल की हे प्रकरण खूप जास्त होईल. त्यामुळे त्यांनी माझ्यावर कारवाई केली. म्हणजेच ए फोर साईजचा कागद काँग्रेसने बरबाद केला, असं मला वाटतं.”

Eknath Shinde on Sanjay Raut
“वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं…”, संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Ravindra Dhangekar met Deputy CM Eknath Shinde sparking rumors of joining Shinde group
मी वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेची भेट घेतली : माजी आमदार रविंद्र धंगेकर
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Aniket Tatkare
अनिकेत तटकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा ‘गद्दारांचा बादशाह’ असा उल्लेख, महायुतीत जुंपली; मंत्र्याकडून राजीनाम्याची तयारी
Jitendra Awhad on Badlapur case akshay shinde
“अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही”, बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा!
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”

संजय निरुपम यांच्या जवळच्या एका व्यक्तीने इंडियन एक्स्प्रेसला ही माहिती दिली आहे की संजय निरुपम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना मुंबईतून लोकसभा लढवायची आहे. ती जागा एकनाथ शिंदे हे त्यांना देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस वगैरे काहीही न बजावता थेट त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे.

वायव्य मुंबई मतदारसंघ हा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे असून, येथून उमेदवारी मिळावी, असा निरुपम यांचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र उमेदवारीबाबत आश्वासन दिले नव्हते. ‘निरुपम यांनी प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच आहे. त्यांना वायव्य मुंबईतून उमेदवारी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. निरुपम यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठीही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पण उमेदवारीबाबत त्यांना कोणत्याच पक्षाने आश्वासन दिलेले नाही.

हेही वाचा >> दोपहर का सामना, शिवसेना, काँग्रेस नी आता शिंदेंची शिवसेना? कसा आहे संजय निरुपम यांचा राजकीय प्रवास?

संजय निरुपम यांचा राजकीय प्रवास कसा?

एक काळ असाही होता जेव्हा संजय निरुपम हे दोपहर का सामनाचे संपादक होते. त्याच काळात ते शिवसेनेतही होते. मात्र २००५ मध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. उत्तर भारतीय फेरीवाल्यांचा मुद्दा त्यांनी उचलून धरला होता. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी मुंबई उत्तर जागेवरुन विजय मिळवला होता. संजय निरुपम हे दोनदा राज्यसभेचे खासदार होते. २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी उत्तर मुंबई लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं.

Story img Loader