केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाला नवी नावं आणि पक्षचिन्ह सुचवण्यास सांगितले. आज (१० ऑक्टोबर) दिवसभर आयोगासमोर झालेल्या सुनावणीत अखेर निर्णय झाला आहे. यानुसार ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे पक्षाचं नाव, तर मशाल हे पक्षचिन्ह मंजूर झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाने दिलेल्या पर्यायपैकी त्यांना हवं तेच नाव आणि पक्षचिन्ह मिळालं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने दिलेले तिन्ही पक्षचिन्ह पर्याय नाकारण्यात आले आहेत. यावर शिवसेनेकडून भास्कर जाधव यांची पहिली प्रतिक्रिया आली. ते एबीपी माझाशी बोलत होते.

भास्कर जाधव म्हणाले, “पहिल्याच प्रयत्नात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पूर्णपणे जिंकले आहेत. आम्हाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव मिळालं आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरेंचंही नाव राहिलं, बाळासाहेब ठाकरे हेही नाव राहिलं. तसेच आम्ही जे तीन पक्षचिन्ह दिली होती त्यापैकी मशाल हे चिन्ह मिळालं. त्यामुळे पहिल्याच राजकीय डावपेचात उद्धव ठाकरे जिंकले आहेत.”

raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Khadakwasla and Hadapsar Constituency
हडपसर, खडकवासला मतदारसंघात पवार ठाकरेंच्या तोफा धडाडणार, एकमेकांना काय उत्तर देणार !
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान राहिले आहेत, कारण..”
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”

“आम्ही आनंदी आहोत, पूर्णपणे समाधानी आहोत. कारण आमच्या बाळासाहेबांचं नाव चोरण्याचं अनेकजण प्रयत्न करत होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे हे नाव आमच्याकडे राहिलं. बाळासाहेब हे नाव बंडखोरांकडे गेलंय. मात्र, उद्धव, बाळासाहेब, ठाकरे ही तिन्ही नावं आमच्या मूळ शिवसेनेकडे राहिले. हा आमचा सर्वात मोठा विजय आम्ही मानतो,” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे आम्हाला नाव मिळाले आहे. आम्ही पहिली लढाई जिंकली आहे. आता शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाली पेटवून हे चिन्ह प्रत्येक घराघरात पोहोचवायचे आहे. काही लोकांनी आपल्या पक्षात काळरात्र निर्माण करण्याचे ठरवले. आता उष:काल सुरू झाला आहे. ही मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आहे, हे आता दाखवायचे आहे, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं

शिंदे गटाची प्रतिक्रिया काय?

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आम्ही खूप समाधानी आहोत, असे म्हस्के म्हणाले आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव तसेच त्यांचे तत्त्व घेऊन पुढे जात आहोत. बाळासाहेबांची शिवसेना हे नाव भेटल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. चिन्हांचे पर्याय देण्यासाठी आम्हाला उद्या सकाळपर्यंत वेळ मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही नव्या चिन्हांची यादी देऊ. आम्हाला खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळाला आहे. शिवसेनेने बाळासाहेबांचा विचार सोडला, तत्व सोडले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला त्यांच्या विचाराप्रमाणेच नाव मिळाले आहे, असे नरेश म्हस्के म्हणाले.