अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांना रस्ता ओलांडताना दुचाकीने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले. यानंतर बच्चू कडूंनी बुधवारी (११ जानेवारी) ट्वीट केलं आणि अपघाताची माहिती देत पहिली प्रतिक्रिया दिली.

बच्चू कडू ट्वीटमध्ये म्हणाले, “आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.”

Two children were injured in pune Narhe due to sudden explosion while bursting firecrackers
गटारावर फटाके फोडताना स्फोट झाल्याने दोन मुले जखमी, सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागातील घटना
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
dumper hit bike, Ratnagiri, Ratnagiri latest news,
रत्नागिरीत डंपरने दुचाकीला उडविले; दोघांचा जागीच मृत्यू
Terrorism started by gangs in Pune crime news Pune news
निवडणुकीच्या तोंडावर शहरात टोळक्याकडून दहशतीचे प्रकार – वारजे, पर्वती, चंदननगर पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
खेड शिवापूर टोलनाका परिसरात मोटारीतून कोट्यवधी रुपये जप्त
thane lift collapse at Raymond
ठाणे: रेमंड इमारतीतील उद्वाहक कोसळले, ११ वर्षीय मुलगा जखमी
hit and run case
नागपुरात आणखी एक ‘हिट अँड रन’, पहाटे घडला थरार…
Helmet compulsory in Pune Directions of Road Safety Committee constituted by Supreme Court
पुण्यात आता हेल्मेटसक्ती ! सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

नेमकं काय घडलं?

बुधवारी (११ जानेवारी) सकाळी अमरावतीत सहा ते साडेसहाच्या दरम्यान बच्चू कडू रस्ता ओलांडत होते. तेव्हा एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू गंभीर जखमी झाले आहेत. अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु असून, डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. तसेच, बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

हेही वाचा : Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर ईडीची छापेमारी

काही दिवसांपासून आमदारांच्या अपघाताची मालिका

दरम्यान, एक महिन्यांच्या कार्यकाळात राज्यातील तीन आमदारांच्या कारचा अपघात झाला आहे. २४ डिसेंबरला भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती नदीत कोसळली. या अपघातात गोरे आणि त्यांचे सहकारी जखमी झाले होते.

४ जानेवारीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात धनंजय मुंडे यांना मुक्का मार लागला आहे. सुदैवाने मुंडे या अपघातातून बचावले आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

हेही वाचा : सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, म्हणाल्या, “ही अशी कटकारस्थानं करण्यापेक्षा ईडी सरकारनं…”

शिंदे गटाचे आमदार आणि रामदास कदम यांचे सुपूत्र योगेश कदम यांचा काही दिवसांपूर्वी कशेडी घाटात अपघात झाला होता. त्यांच्या गाडीला पाठीमागून एका डंपरने धडक दिली होती. मात्र, अपघातात कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नव्हती.