मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जालन्यात येऊन आंदोलनस्थळी भेट घ्यावी, अशी मागणी केली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आज (१३ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता मनोज जरांगेंना भेटायला जालन्याला जाणार असल्याचं वृत्त आहे. यावर मनोज जरांगेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच यानंतर उपोषण सोडणार की नाही यावरही भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे म्हणाले, “काही हरकत नाही, त्यांनी मला भेटायला यावं. मात्र, ते भेटायला येणार आहे की नाही याबाबत माझ्याकडे खात्रीलायक माहिती नाही. ते आले तर त्यांचं मराठा समाजाच्या वतीने स्वागत आहे. आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळही दिला आहे. ते इथे आल्यावर त्यांच्याशी आम्ही मराठा आरक्षणावर पुन्हा चर्चा करूच.”

“आमची मूळ मागणी मराठा आरक्षणाची”

“आमची मूळ मागणी मराठा आरक्षणाची, कुणबी प्रमाणपत्राची आहे. हीच मागणी ते भेटायला आल्यावर पुन्हा त्यांच्यासमोर करेन,” असंही मनोज जरांगेंनी नमूद केलं.

हेही वाचा : “सरकारला मनोज जरांगे पाटलांना संपवायचं आहे, त्यांना…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

“ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही”

मराठा समाजाला ३० दिवसात आरक्षण मिळेल, असं आश्वासन मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी दिलं तर तुम्ही ही जागा सोडणार का, उपोषण सोडणार का? या प्रश्नावर मनोज जरांगे म्हणाले, “नाही, ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना भेटायला वेळ हवा होता, तो वेळ मी दिला.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First reaction of manoj jarange over cm eknath shinde dcm ajit pawar coming in jalna pbs