अलिबाग- अलिबाग तालुक्यातील कणकेश्वर मंदिरालगत असलेल्या जंगल परिसरात दुर्मिळ अशा रस्टी स्पॉटेड रानमांजराचे प्रथमच दर्शन झाले आहे. सर्वात लहान आकारातील मांजरांची प्रजाती म्हणून ही मांजर ओळखली जाते.
वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संस्थेचे सदस्य अदिती सगर आणि समीर पालकर हे कणकेश्वर मंदीर परिसरालगतच्या जंगल परिसरात भ्रमंती करत असताना त्यांना ही मांजर आढळून आली. रस्टी स्पॉटेड कॅट नावाने ओळखली जाणारी ही मांजर यापूर्वी कधीही अलिबाग लगतच्या परिसरात आढळून आली नव्हती. ही रानमांजर प्रामुख्याने ओल्या दमट पानगळीच्या जंगलात आढळून येते. राज्यात ताडोबा आणि पश्चिम घाट परिसरात या मांजरांचे वास्तव्य आढळून आले आहे.
हेही वाचा – विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या दबावापुढे न झुकण्याची भाजपची भूमिका
हेही वाचा – राणांसमोर घटक पक्षांची एकजूट राखण्याचे आव्हान
अलिबागमध्ये प्रथमच ही मांजर आढळून आली आहे. त्यामुळे या परिसरातील निसर्ग आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे मत वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी यावेळी नमूद केले.