कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय पहिले महिला साहित्य संमेलन सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात भरविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या संमेलन समितीच्या कार्याध्यक्षपदी कवयित्री उषा परब व सचिवपदी डॉ. सोनल लेले यांची निवड करण्यात आली आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पहिले महिला राज्यस्तरीय साहित्य संमेलन ८, ९ व १० नोव्हेंबर रोजी होऊ घातले आहे, अशी माहिती उषा परब यांनी आजच्या बैठकीत दिली.
या बैठकीत साहित्य संमेलन समिती करण्यात आली त्यात कार्याध्यक्ष उषा परब, सचिव डॉ. सोनल लेले, कोषाध्यक्ष माधवी शिरसाट, सदस्य अ‍ॅड. सुषमा प्रभुतेंडोलकर, वैशाली पंडित, वंदना करंबेळकर, किशोरी गव्हाणकर, स्मरणिका समिती डॉ. तरुजा भोसले यांची निवड करण्यात आली.
सावंतवाडी नगरपालिका नगराध्यक्ष बबन साळगांवकर व उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी या संमेलनास नगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगितले असल्याचे उषा परब म्हणाल्या. शिवाय हे संमेलन महिलांचे असल्याने सर्व महिला भगिनींनी एकत्रित येऊन संमेलन यशस्वी करण्याचे ठरविले आहे, असे त्यांनी सांगितले.
आजच्या नियोजन बैठकीत उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक उमाकांत वारंग, उषा परब, डॉ. तरुजा भोसले, वैशाली पंडित, डॉ. सोनल लेले, डॉ. संगीता तूपकर, सुषमा प्रभुतेंडोलकर, भारती भाट, संध्या लिखिते, वंदना करंबेळकर, किशोरी गव्हाणकर, सुहासिनी सडेकर, अ‍ॅड. प्रकाश परब, भरत गावडे, नकुल पार्सेकर, अभिमन्यू लोंढे, ओंकार तुळसुलकर, मीरा कासार, विजया रामाणे आदी उपस्थित होत्या. महिला विजय साहित्य, महिलांवरील अत्याचार अशा विविध स्वरूपाच्या साहित्य स्मरणिका प्रकाशित  होईल असे सांगण्यात आले. हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी निर्णय घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा