मोहनीराज लहाडे

नगर : भारतीय यांत्रिकी दलांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या डावपेचात्मक युद्धसरावांच्या प्रात्यक्षिकात यंदा प्रथमच ‘स्वार्म’ या भारतीय बनावटीच्या ड्रोनचा वापर करण्यात आला. स्वदेशी बनावटीचे ‘स्वार्म’ ड्रोन झुंड युद्धतंत्रासाठी, शत्रूवर पाळत ठेवणे तसेच आक्रमण मोहिमांसाठी यांत्रिकी पायदळात दाखल केले आहे. त्याचे नोडल सेंटर म्हणून नगरमधील यांत्रिकी पायदळ केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी ‘स्वार्म’ ड्रोनचा युद्धसराव प्रात्यक्षिकात प्रथमच वापर करण्यात आला.

ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
Heritage walk for voting awareness with the help of Municipal Corporation Mumbai print news
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘हेरिटेज वॉक’, महापालिकेचा संस्थेच्या मदतीने अनोखा उपक्रम
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
Most robotic surgeries performed by Tata hospital in shortest time
टाटा रुग्णालयाकडून कमी कालावधीत सर्वाधिक रोबोटिक शस्त्रक्रिया

आर्मर्ड कॉर्प सेंटर अँड स्कूल (एसीसी अँड एस), मेकॅनाईझ्ड इन्फंर्ट्ी रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) यांनी एकत्रितपणे युद्धसरावांची प्रात्यक्षिके नगर शहराजवळील, मनमाड रस्त्यावरील ‘केके रेंज’ या क्षेत्रात आयोजित करण्यात आली होती.  या प्रात्यक्षिकांमध्ये देशी बनावटीचा अर्जुन रणगाडा आकाश भेदी मशीनगन तोफांसह तर टी-९० (भीष्म), टी-७२ (अजय), पाण्यातून मार्ग काढणारे बीएमपी-२ (सारथ) यासह बहुउद्देशीय लढाऊ चिलखती वाहने रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांसह तसेच सुखोई-३० विमाने, हेलिकॉप्टर व ड्रोन सहभागी झाले होते. सकाळी १ तास १० मिनिटे ही प्रात्यक्षिके सुरू होती. त्यामध्ये ८०० ते १८०० मीटपर्यंतचे लक्ष अचूक वेधून भारतीय लष्कराने शस्त्रास्त्रांची मारक क्षमता दाखवून दिली.

हेही वाचा >>>“…अन् जवान नेते हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार”, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोमणा

‘केके रेंज’विषयी

’भारतीय यांत्रिकी दलातर्फे दरवर्षी ‘केके रेंज’ येथे युद्धसराव क्षेत्रात प्रात्यक्षिके आयोजित केली जातात.

’यातून तरुण अधिकाऱ्यांना युद्धाभ्यास, लष्करात दाखल झालेल्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर, डावपेचांचा सराव होतो.

’हा युद्धाभ्यास पाहण्यासाठी भारतीय लष्करातील विविध आस्थापनातील तरुण अधिकारी प्रशिक्षणार्थी तसेच लष्करी महाविद्यालयातील विद्यार्थी आवर्जून उपस्थित असतात.

भारतीय यांत्रिकी दलांनी एकत्रित आयोजित केलेला युद्धाभ्यास अनुभवण्यासाठी दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, नायजेरिया, नेपाळ, केनिया, ब्राझील या देशातील लष्करी अधिकारी उपस्थित होते.