अलिबाग : अलिबाग तालुक्यातील साखर गावची मच्छीमार बोट अलिबागजवळच्या समुद्रात बुडाली. सुदैवाने बोटीवरील सर्व खलाशी बचावले आहेत. आज दुपारच्या सुमारास जगदीश बामजी यांच्या मालकीची ही बोट १५ खलाशांसह मासेमारीसाठी निघाली असता कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस बोट अचानक बुडू लागली.
जवळच असलेल्या दुसऱ्या मच्छीमार बोटीवरील खलाशांनी या बुडणाऱ्या बोटीवरील खलाशांना आपल्या बोटीवर घेतले. मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे अधिकारी कर्मचारी अलिबाग किनारी पोहोचले असून ते बोटीला झालेल्या अपघाताची माहिती घेत आहेत. स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त बोटीला किनारयावर आणण्यात आली आहे.