कराड : एमडी ड्रग्ज आणि गांजा तस्करी प्रकरणी पोलिसांनी पाच अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा ग्रॅम एमडी जप्त केले आहे. पोलीस उपअधिक्षक आमोल ठाकूर यांच्या पथकाने कारवाई केली. गांजा तस्करी प्रकरणी शहर पोलिसांनी केली. त्यात सव्वा लाखांचा सहा किलो गांजा जप्त आहे. मंगळवार (दि. ११) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

राहुल अरुण बडे (वय ३७) रा. पाण्याच्या टाकीजवळ, सोमवार पेठ, कराड, समीर उर्फ सॅम जावेद शेख (वय २४) रा. आदर्श कॉलनी, कार्वे नाका, कराड, तौसीब चाँदसाहेब बारगिर (वय २७) रा. अष्टविनायक मंगल कार्यालयानजीक, कार्वेनाका, कराड यांना ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक आहे. तर गणेश वायदंडे (वय २४) रा. बुधवार पेठ, कराड आणि अशोक बिराजदार (५०) रा. रेठरेकर कॉलनी, कराड असे  गांजा तस्करीप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ओगलेवाडी (ता. कराड) येथील टेंभू रस्त्यावर एकजण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी उपअधीक्षक कार्यालयातील सहायक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सहाय्यक फौजदार सपाटे यांच्यासह पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस पथक मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास हजारमाची (ता. कराड) गावच्या हद्दीत ओगलेवाडी रेल्वे स्टेशननजीक रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी मध्यरात्री तिघेजण ओगलेवाडी रेल्वे स्थानकाकडून चालत येताना निदर्शनास आले.

पोलिसांनी त्या तिघांनाही सापळा रचून ताब्यात घेतले. तसेच त्यांची अंगझडती घेतली असता राहुल बडे, सॅम शेख दोघांकडे प्लास्टिकच्या पिशवीत स्फटीकासारखे कण असलेली पावडर आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी तिघाही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. त्याचबरोबर संशयितांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत. तर दुसरी कारवाई फौजदार निखील मगदूम यांच्या पथकाने मंगळवार (दि. ११) रोजी मध्यरात्री केली. गोदाम परिसरात दोघांना अटक केली. त्यात गणेश व अशोक दोन संशयास्पद रित्या फिरत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिशव्या आढळल्या. त्यात एका पिशवीत चार, तर दुसऱ्या पिशवीत दोन असा सहा किलोचा सव्वा लाखांचा गांजा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. या दोन्ही प्रकरणी अधिक तपासासाठी तीन पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

Story img Loader