पुणे-मुंबई महामार्गावर अपघात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावर शिलाटणे गावाजवळ रविवारी सकाळी भरधाव मोटार समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात मोटारीतील पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले चौघे जण मूळचे हरियाणातील असून सध्या ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड भागात वास्तव्यास होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शालिनी रुपनारायण तिलोक (वय २०), सीमा किसन राज (वय ३६), मासीदेवी नाथूराम तिलोक (वय ६५), महावीर किशन तिलोक (वय ४४, सर्व सध्या रा. शांती पार्क, मीरा रोड, जि. ठाणे), रिहान रिजवान अन्सारी (वय ३०, रा. बिलाल मशिदजवळ, गोल दरवाजा, मुंबई) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नाव आहेत. मासीदेवी तिलोक आजारी होत्या. त्यांना उपचारासाठी निपाणी येथील एका रुग्णालयात घेऊन तिलोक कुटुंबीय मोटारीतून पुण्याकडे निघाले होते. मुंबई-पुणे महामार्गावर सकाळी सव्वा आठच्या सुमारास  चालक अन्सारीचे मोटारीवली नियंत्रण सुटले आणि मोटार दुभाजक ओलांडून मुंबईकडे  येणाऱ्या  ट्रकवर (कंटेनर) आदळली. अपघातात मोटारीचा चुराडा झाला.

अपघाताची माहिती मिळताच आयआरबीचे पथक, देवदूत पथक, ग्रामस्थ, पोलीस तसेच लोणावळा सायर्कंलग क्लबच्या सदस्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक सचिन बनकर यांनी घटनास्थळी भेट दिली.  ट्रकखाली अडकलेली मोटार काढण्यात आली. मोटारीतील पाच जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.  अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर काही काळ कोंडी झाली होती.