तासगाव येथील डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज कॉर्नरवर नाकाबंदी करीत असताना पोलिसांना बोलेरो गाडीतून पाच लाखांची रोकड शनिवारी मिळाली. एम.एच.२५-आर-६६४७ या गाडीची तपासणी करीत असताना पोलिसांना पाच लाख तेरा हजार रुपये मिळून आले. या संदर्भात गाडी चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे चौकशी सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक रमेश बनकर यांनी सांगितले. सदरची व्यक्ती शासकीय ठेकेदार असून कामगारांच्या वेतनासाठी रक्कम आणल्याचे संशयीत सांगत आहे. मात्र पोलीस त्याची सत्यता पडताळून पहात असल्याचे निरीक्षक बनकर यांनी सांगितले.
दरम्यान, जत येथे सुनील पट्टणशेट्टी याच्याकडे मिळालेल्या ६ लाखांच्या रोकड प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा