कराड : पाटण तालुक्यातील करपेवाडी येथे महाविद्यालयीन युवतीचा गळा चिरून झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तब्बल साडेतीन वर्षांनी एका मांत्रिकासह पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. करपेवाडीच्या शिवारात २२ जानेवारी २०१९ रोजी भाग्यश्री संतोष माने या अठरा वर्षांय महाविद्यालयीन युवतीची गळा चिरून हत्या होताना या गंभीर गुन्ह्याची उकल होत नव्हती. त्या दिवशी भाग्यश्री ही सकाळी कॉलेजला जाते असे सांगून, घरातून निघून गेल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते.
याबाबत विविध पातळ्यांवर तपास झाला. मात्र, साडेतीन वर्ष उलटूनही या हत्येच्या गुन्ह्याचा छडा लागत नव्हता. दरम्यान, पोलीस यंत्रणेने विविध पातळयांवर या प्रकरणाचा कसून तपास करून अखेर या गुन्ह्यात पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यात एका मांत्रिकाचा समावेश असल्याने ही हत्या अंधश्रद्धेतून झाली किंवा काय ? याकडे आता लोकांच्या नजरा लागून रहाणार आहेत.