मुंबई-संभाजीनगर-औरंगाबाद महामार्गावर ट्रक आणि एसटीची धडक झाली. या भीषण अपघातात पाचजण ठार झाले आहेत. सिंदखेडराजा जवळ पळसखेड चमकत या गावाजवळ हा भीषण अपघात झाला. ही बस संभाजी नगरहून वाशिमकडे जात होती. या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.
नेमकी काय घटना घडली?
मुंबई-संभाजीनगर-नागपूर च्या जुन्या महामार्गाजवळ हा अपघात झाला. ही बस संभाजीनगरहून वाशिमच्या दिशेने जात होती. त्याचवेळी सकाळी ६.१५ च्या दरम्यान ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या अपघातात बसचा चालक जागीच ठार झाला आहे. आज सकाळी ६.१५ वाजता हा अपघात झाला. अपघाताच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आहेत. तसंच मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
पाच जणांची प्रकृती चिंताजनक
मुंबई-संभाजीनगर-नागपूर महामार्गावरची वाहतूक या ठिकाणी थांबली आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अपघात इतका भीषण होता की पाच लोक जागीच ठार झाले आहेत. १३ जण जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे असंही कळतं आहे. सिंदखेडराजा जवळच्या पळसखेड चमकत गावाजवळ हा अपघात झाला.