गोवेदिगर (ता वाई) गावच्या हद्दीत साळींदर या वन्य प्राण्यांची शिकार करून त्याचे मांस विकल्याप्रकारणी
पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
साळिंदर या वन्य प्राण्यांची शिकार गोवेदिगर व खोलवडी (ता वाई) गावच्या हद्दीत करण्यात आल्याची माहिती मिळाली. वन परिक्षेत्र अधिकारी महेश झाझुणें यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकला असता त्या ठिकाणी साळिंदर या वन्य प्राण्यांची हत्यारांच्या साहाय्याने हत्या केल्याचे निदर्शनास आले.यानंतर हे मांस परिसरात काही लोकांना विकण्यात आल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी विक्रम प्रवीण मिठपुरे (वय १९) व प्रवीण अमरसिंह मिठपुरे( वय ४० ) दोघेही राहणार गोवेदिगर ता वाई यांनी शिकार केली म्हणून व अनिल किसन शिंदे (वय ४६) सचिन तुळशीदास शिंदे( ३४) रा गोवेदिगर व जीवन वामन धुमाळ (वय ४४) रा मर्ढे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या सर्वांकडून शिकारीसाठी वापरलेली शस्त्रे व मुद्देमाल जप्त केला आहे.दरम्यान खोलवडी येथील शिकार झालेल्या शेत मालक नंदकुमार माने यांना घटनेची माहीती असून देखील त्याने वन अधिकाऱ्यांपासून लपवून ठेवून साळींदर प्राण्याची शिकार करणाऱ्या गुन्हेगारांनाच मदत केल्याचे दिसून येत असल्याने माने यांना त्यांच्या शेतात झालेल्या शिकारीबाबत नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती वन अधिकारी महेश झांजुरने यांनी दिली.
या कारवाईत वनपाल संग्राम मोरे (भुईंज), सुरेश पटकारे (वाई),वनरक्षक रजिया शेख (बेलमाची) संजय आडे(भुईंज)लक्ष्मण देशमुख ( बोपेगाव), वैभव शिंदे (वाई) वसंत गवारी (बोपार्डी) अजित पाटील (जोर)प्रदीप जोशी (वासोळे)महेंद्र मोरे,संदीप पवार,सुरेश सूर्यवंशी यांनी भाग घेतला.