वाई: सातारा शहरात कोयता नाचवून दहशत माजविणाऱ्या पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. सातारा शहरातील पोवई नाका परिसरात दोन ठिकाणी सुमारे पाच जणांच्या कोयता गँगच्या टोळक्याने हातात कोयता नाचवत राडा केला.

सर्वसामान्यांना व वाहन चालकांना कोयता उगारुन लुटमारीचा प्रकार केल्याने पोवई नाका हादरुन गेला. यावेळी गस्तीवर असणार्‍या पोलिसांनी संशयितांची धरपकड करण्याचा प्रयत्न केला असता एक पोलीस कर्मचारी  जखमी झाले. दरम्यान, दोघांना ताब्यात घेतले असून इतर संशयित पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

VIDEO :

यावेळी विनायक मनवी असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.  सुमारे पाच जणांच्या टोळक्याने सातारा शहरातील पोवई नाक्यावरील सयाजी हायस्कूलसमोर कोयता नाचवत दहशत  करण्यास सुरुवात केली. काही हुल्लडबाज युवक बेधडकपणे मुख्य रस्त्यालगत आरडाओरडा करत वाहना चालकांना हुसकावत होते. सुमारे दहा मिनिटे संशयित युवकांनी हुल्लडबाजी केली. त्यानंतर पोवई नाक्यावरीलच जिल्हा  बँकेच्या समोर पुन्हा टोळीने कोयते नाचवत दहशत निर्माण  केली. यावेळी संशयितांना पोलिसांनी पकडले.

सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.पुणे येथील सिंहगड रस्त्यावर  कोयता नाचवून दहशत करणाऱ्या गुंडांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच पद्धतीने साताऱ्यात मध्यवस्तीत होऊ नका परिसरात कोयता नाचवत दहशतवाद माजविणाऱ्या पाच जणांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Story img Loader