दुष्काळी भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कवठेमहांकाळ तालुक्यात लवकरच पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभारणार असल्याची ग्वाही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.
कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एम येथे महापारेषणच्या ४०० के. व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते रविवारी येथे करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजयराव सगरे, महापारेषणचे मुख्य अभियंता जी. टी. मुंडे, अधीक्षक अभियंता एस. एम. चिंचवलकर, नामदेवराव करगणे, आप्पासाहेब िशदे आदी उपस्थित होते.
तालुक्यात मोठे उद्योग उभे करण्यासाठी रस्ते, पाणी आणि विजेची नितांत आवश्यकता असते. यापकी रस्ते व पाण्याचा प्रश्न मिटला असून आता ४०० के. व्ही. उपकेंद्र झाल्यावर विजेचा प्रश्नही मिटणार आहे असे सांगून गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले, माझे पुढचे ध्येय बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हे आहे. यामुळे पूर्ण जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना काम मिळेल.  लवकरच प्रशासन या कामाला लागणार असल्याचेही गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले.
राज्याच्या प्रगतीत विद्युत वितरण कंपनीचा सिंहाचा वाटा असून या उपकेंद्राच्या निर्मितीनंतर जिल्ह्यातील भारनियमाचा प्रश्न कायमचा मिटणार असल्याचे सांगून गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले, या उपकेंद्राचा शुभारंभ म्हणजे औद्योगिकीकरणाचा शुभारंभ असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजयराव सगरे, नामदेवराव करगणे व आप्पासाहेब िशदे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास दत्तात्रय पाटील, गजानन कोठावळे, भाऊसाहेब पाटील, भानुदास पाटील, चंद्रकांत पाटील, सुरेखा कोळेकर, अनिल िशदे, टी.व्ही. पाटील, अजित कारंडे, दादासाहेब कोळेकर, प्रशांत शेजाळ, कोलप, एस. आर. हाक्के, एस. एस. कुंभार, एम. एस. भिसे आदी उपस्थित होते.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?