दुष्काळी भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कवठेमहांकाळ तालुक्यात लवकरच पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभारणार असल्याची ग्वाही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.
कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एम येथे महापारेषणच्या ४०० के. व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते रविवारी येथे करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजयराव सगरे, महापारेषणचे मुख्य अभियंता जी. टी. मुंडे, अधीक्षक अभियंता एस. एम. चिंचवलकर, नामदेवराव करगणे, आप्पासाहेब िशदे आदी उपस्थित होते.
तालुक्यात मोठे उद्योग उभे करण्यासाठी रस्ते, पाणी आणि विजेची नितांत आवश्यकता असते. यापकी रस्ते व पाण्याचा प्रश्न मिटला असून आता ४०० के. व्ही. उपकेंद्र झाल्यावर विजेचा प्रश्नही मिटणार आहे असे सांगून गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले, माझे पुढचे ध्येय बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हे आहे. यामुळे पूर्ण जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना काम मिळेल. लवकरच प्रशासन या कामाला लागणार असल्याचेही गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले.
राज्याच्या प्रगतीत विद्युत वितरण कंपनीचा सिंहाचा वाटा असून या उपकेंद्राच्या निर्मितीनंतर जिल्ह्यातील भारनियमाचा प्रश्न कायमचा मिटणार असल्याचे सांगून गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले, या उपकेंद्राचा शुभारंभ म्हणजे औद्योगिकीकरणाचा शुभारंभ असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजयराव सगरे, नामदेवराव करगणे व आप्पासाहेब िशदे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास दत्तात्रय पाटील, गजानन कोठावळे, भाऊसाहेब पाटील, भानुदास पाटील, चंद्रकांत पाटील, सुरेखा कोळेकर, अनिल िशदे, टी.व्ही. पाटील, अजित कारंडे, दादासाहेब कोळेकर, प्रशांत शेजाळ, कोलप, एस. आर. हाक्के, एस. एस. कुंभार, एम. एस. भिसे आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा