परभणी : सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा या ठिकाणी असलेल्या मारुती दगडू राठोड यांच्या शेतातील आखाड्यावर शौचालयाच्या टॅंकची सफाई करताना पाच सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेतील एका मजुराची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व मजूर एकाच कुटुंबातले व नात्यातले असल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथे मारुती राठोड यांचे शेत आहे. या ठिकाणी सेप्टिक टॅंकची सफाई करण्यासाठी काही सफाई कामगारांना बोलावण्यात आले होते. गुरुवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान हे सर्व कामगार शेतातील आखाड्यावर आले. टॅंकची सफाई सुरू असताना एक कामगार रात्री आठ ते नऊच्या दरम्यान टॅंकमध्ये बेशुद्ध पडला. त्याला वाचवण्यासाठी इतर चारजण आत उतरले. एका मागोमाग एक पाचजण टॅंकमध्ये गेले, मात्र बराच वेळ झाला तरी कोणीच बाहेर येत नसल्याने त्या ठिकाणी असलेल्या एकाने आरडाओरडा केला.

Will Bharat Gogawale Become Minister
Bharat Gogawale : “बॅगेतून आता चार कोट आणले आहेत”, मागच्या वेळी मंत्रिपद हुकलेल्या भरत गोगावलेंचं विधान चर्चेत!
Vandre East Seat Result 2024 Who is Varun Sardesai
Who is Varun Sardesai : झिशान सिद्दिकींचा पराभव…
Rebel independent candidates Election Results
पक्षाविरोधात जाऊन बंडखोरी करणाऱ्या ‘त्या’ ३६ उमेदवारांपैकी किती जिंकले? वाचा संपूर्ण यादी
Women Winner Candidates List
Maharashtra Assembly Result 2024 Women Winners List : ‘लाडक्या बहिणीं’च्या राज्यात महिला आमदारांची संख्या रोडावली; विधानसभेत कितीजणींना संधी?
no alt text set
राज्यात जातीय विभाजनाचा प्रयत्न कधीही घडला नव्हता; पृथ्वीराज चव्हाण यांची खंत
Who is Amol Khatal Balasaheb Thorat Loss
Amol Khatal : आठ वेळा आमदार झालेल्या बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे अमोल खताळ कोण आहेत? जाणून घ्या!
What Chhagan Bhujbal Said About Devendra Fad
Chhagan Bhujbal : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे का? छगन भुजबळ म्हणाले, “आमचा विरोध…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “अरे पठ्ठ्या, तू आमदार कसा होतो तेच बघतो”, अजित पवारांनी खुलं आव्हान दिलेला नेता जिंकला की हरला?

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंच्या तोंडी नैतिकतेच्या गोष्टी शोभत नाही, ते आता…”, ‘त्या’ टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर!

काही वेळाने आसपासचे लोक जमा झाले व पोलीसही हजर झाले. यावेळी पोलिसांनी टँकवरील सिमेंटचे छत जेसीबीने फोडून टाकले. त्यानंतर आत गुदमरून मेलेल्या सर्व सफाई कामगारांना बाहेर काढण्यात आले. यात एकाच कुटुंबातील पाचजणांचा समावेश आहे. मृतांमध्ये शेख सादिक (वय ४५), शेख शाहरुख (वय २०), शेख जुनेद (वय २९) शेख नवीद (वय २५) शेख फिरोज (वय १९) या चौघांचा समावेश असून शेख साबीर (वय १८) हा कामगार अत्यवस्थ आहे. त्याला परळी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

हेही वाचा – सोलापूर : उद्धव ठाकरेंकडून न्यायालयाचा अवमान; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा आरोप

कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. एका कामगारास गंभीर अवस्थेमध्ये अंबजोगाई येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची माहिती होताच त्वरित आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.