कराड : अहमदाबाद परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात पाच गुंडांनी दिल्लीमार्गे गोव्यात येऊन मौजमजा केली. त्यानंतर कोल्हापूरमध्ये देवदर्शन करून, ते मुंबईला जात असताना तळबीड पोलिसांनी नियोजनबध्द सापळा रचून पाचही गुंडांच्या मुसक्या आवळल्या. मिहिर बल्लदेवभाई देसाई (वय २२), प्रिन्स बजरंगलाल जागीड (वय २३), पवन कनुभाई ठाकूर (वय २५), कैलास कमुरचंद दरजी (वय ३४) आणि जिग्रेशभाई अमृतभाई रबारी (२६, सर्व रा. अहमदाबाद राज्य- गुजरात) अशी या गुंडांची नावे आहेत. त्यांना अहमदाबाद पोलिसांनी याब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अहमदाबादच्या वस्त्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे असलेल्या कुख्यात गुंडांनी हाहाकार माजवला होता. यामुळे गुजरात पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. हे गुंड फरार झाल्याने त्यांना पकडण्यासाठी गुजरात पोलीस, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अहोरात्र झटत होते. दरम्यान, अहमदाबादच्या पोलीस अधीक्षकांनी सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना यातील दोन गुंडांची छायाचित्रे पाठवत ते कोल्हापूरहून मुंबईला निघाल्याचे सांगितले. शेख यांनी सदरची आराम बस १५ मिनिटांत तासवडे पथकर नाक्यावर येत असल्याची माहिती तळबीड पोलीस ठाण्याचे पोलीस सहनिरीक्षक किरण भोसले यांना दिली. यावर किरण भोसले हे सहकाऱ्यांसह शीघ्रगतीने टोलनाक्यावर धावले. आणि ती आरामबस ताब्यात घेत प्रवाशांसह पोलीस ठाण्यात आणली. गुंडांकडे शस्त्रे असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी खबरदारी घेतली. आराम बसमध्ये प्रवेश करत दरवाजा लावून घेऊन धाडसाने छायाचित्रातील दोन्ही आरोपींना पकडले.

हेही वाचा…प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ

आराम बसमधील प्रवाशांची यादी, प्रत्येकाचे छायाचित्र गुजरात पोलिसांना पाठवले. त्यावेळी गुजरात पोलिसांनी लगेच प्रवाशांत आणखी तीन आरोपी असल्याचे स्पष्ट करताच त्यांना पकडण्याची तयारी सुरू असतानाच आरोपींनी आराम बसच्या खिडकीतून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांच्याही मुसक्या आवळल्या. आता गुजरात पोलीस या गुंडांना जेरबंद करून अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.