मिरजमधील भोसे गावात जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. विषबाधा झालेल्या ७२ जणांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वास्तुशांतीच्या भोजन कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करत विषबाधा झालेल्यांना रुग्णालयात हलविले. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. दरम्यान, सध्या पोलिसांकडून अन्नाचे नमुने घेण्यात आले असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader