यवतमाळमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील १६० विद्यार्थ्यांना मंगळवारी मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचे समजत आहे. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी ५० विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यवतमाळच्या उमरी तालुक्यात असणाऱ्या मुरली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली. अन्न शिजवताना त्यामध्ये पाल पडली होती, मात्र ही गोष्ट आचाऱ्याच्या लक्षात न आल्याने शाळेतील १६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2014 रोजी प्रकाशित
यवतमाळमध्ये मध्यान्ह भोजनातून १६० शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा
यवतमाळमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील १६० विद्यार्थ्यांना मंगळवारी मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचे समजत आहे.

First published on: 01-07-2014 at 07:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food poisoning to 160 school students in yavatmal