यवतमाळमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील १६० विद्यार्थ्यांना मंगळवारी मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचे समजत आहे. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी ५० विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यवतमाळच्या उमरी तालुक्यात असणाऱ्या मुरली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली. अन्न शिजवताना त्यामध्ये पाल पडली होती, मात्र ही गोष्ट आचाऱ्याच्या लक्षात न आल्याने शाळेतील १६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा