अलिबाग : रत्नागिरी इथं बुधवारी झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना ये जा करण्याकरिता रायगड जिल्ह्यातून तब्बल १५० एस टी बसेस पाठवण्‍यात आल्या. त्यामुळे रायगड जिल्ह्यात एस टी बसेसची कमतरता जाणवत असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागत आहेत. अलिबाग आगारातून दिवसभरात ५४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

आज बुधवारी (दि. 21) रत्‍नागिरी येथे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्‍यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्‍या उपस्थितीत मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रम होणार आहे. यासाठी संपूर्ण रत्‍नागिरी जिल्‍हयातून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारया महिलांना ये जा करण्‍यासाठी बसेस उपलब्‍ध करून देण्‍यात आल्‍या आहेत. यामध्‍ये रत्‍नागिरी जिल्‍हयाला लागून असलेल्‍या जिल्‍हयांमधून एसटी बसेस मागवण्‍यात आल्‍या आहेत. यामध्‍ये रायगड जिल्‍हयातील आठ आगारांमधून तब्‍बल १५० बसेस उपलब्‍ध करून देण्‍यात आल्‍या आहेत.

ST buses Amravati scrap , passengers Amravati ST bus,
अमरावतीत १४९ एसटी बसेस भंगारात; कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
17 patients admitted to Nagpur hospitals after citizens flew kites with dangerous manja
नागपूर : मकरसंक्रांतीला पतंगबहाद्दरांचा रस्त्यावर धिंगाणा! तब्बल १७ जण रुग्णालयात…
total of 1 thousand 415 kilometers cycled from Delhi to Mumbai by Feet Bharat Club of HSNC University
‘एचएसएनसी’ विद्यापीठाची सायकलद्वारे भारत भ्रमंती
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan news in marathi
साहित्याच्या मांडवात राजकारण्यांची ‘सरबराई’!
in Thane 2 810 received Lake Ladki Yojana benefits
ठाणे जिल्ह्यात वर्षभरात २ हजार लाडक्या लेकींना मिळाला लाभ, लेक लाडकी योजनेचे काम प्रगतीपथावर
LIC special plan for women print eco news
‘एलआयसी’ची महिलांसाठी विशेष योजना; मिळणार ७ हजार रुपये महिना मानधन
Financial assistance, inter-caste marriages, eligible
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आर्थिक मदत, कोण ठरेल पात्र?

हे ही वाचा… Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!

या बसेस रत्‍नागिरीकडे रवाना झाल्‍या. त्‍याचा परीणाम जिल्‍हयातील एसटीच्‍या नियमित फेरयांवर झालेला पहायला मिळाला. नियमित मार्गांवर धावणारया एस टी बसेसची संख्‍या कमी झाल्‍याने जिल्ह्यातील प्रमुख बसस्‍थानकात सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी झाली आहे. रक्षाबंधनासाठी भावाकडे आलेल्‍या बहिणींची परतीच्‍या प्रवासात गैरसोय झाली. लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण मार्गावर धावणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द करण्याची वेळ एस टी वर आली आहे. त्यामुळे प्रवाशांना एस टी ची वाट पहात बसावं लागत आहे. उपलब्‍ध बसेसची संख्‍या लक्षात घेवून फेरयांचे नियोजन करताना एसटी वि भागाला कसरत करावी लागत आहे. मात्र विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं एस टी कडून सांगण्यात आलं आहे. असं असलं तरी पुरेशा एस टी बसेस अभावी आज आणि उद्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरं जावं लागणार आहे.

अलिबाग आगारातून दिवसभरात ५४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. अक्कलकोट, शिर्डी, पंढरपूर, सातारा, पोलादपूर, रोहा, पाली, रेवस, रेवदंडा, थळ, किहीम, सासवणे, कनकेश्वर या मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या. तर अलिबाग पनवेल मार्गावरील विनावाहक गाड्याच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाश्यांची मोठी गैरसोय झाली होती. दोन दिवस आगारातून सुटणाऱ्या दिर्घ पल्ल्याच्या आणि ग्रामिण भागातील गाड्या बंद राहणार असल्याचे आगार व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा… Badlapur Crime : “बदलापूरचा नराधम अक्षय शिंदे ऐवजी अकबर खान किंवा शेख असता तर..”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य

रत्‍नागिरी येथे होणारया कार्यक्रमासाठी रायगड विभागातून १५० बसेस रवाना झाल्‍या आहेत. त्‍यामुळे उपलब्‍ध एसटी बसेसची संख्‍या लक्षात घेवून फेरयांचे नियोजन करण्‍यात येत आहे. प्रवाशांची खास करून विद्यार्थ्‍यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्‍याचा प्रयत्‍न आहे. – दीपक घोडे, विभाग नियंत्र‍क एसटी रायगड विभाग

Story img Loader