भल्या पहाटे घरात घुसून अल्पवयीन मुलीला पळवून नेत धार्मिक विधींसह तिच्याशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणात औरंगाबादच्या हर्सूल पोलिसांनी लग्न करणाऱ्या व्यक्तीसह त्याला मदत करणाऱ्या अन्य दोघांना अटक केली आहे.

24 डिसेंबर रोजी हर्सूल परिसरातील एका अल्पवयीन मुलीचं तिचे आई वडील परगावी गेले असतानाची संधी साधत अपहरण करण्यात आलं होतं. बायजीपूरा येथील तीन तरुणांनी त्या मुलीचं अपहरण केलं. घरुन पळवून नेत धार्मिक विधींसह जबरदस्ती तिचं लग्न लावण्यात आलं. हा सर्व प्रकार मुलीच्या लहान भावाने फोन करुन आई-वडिलांना कळवला. वडिलांनी तातडीने जिन्सी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी उमर शेख, फारुक शेख आणि समीर शेख या तीन आरोपींना अटक केली आहे. तर, त्या मुलीला तिच्या वडिलांकडे सोपावण्यात आले आहे.

Story img Loader