सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोलापूरजवळ हिरज येथे एका बंद शेतघरातून ३२ लाख १९ लाख रुपयांचा विदेशी दारूचा अवैध साठा जप्त केला. मात्र हा साठा कोणी केला, याचा उलगडा होऊ शकला नाही.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत हिरज येथे एका शेतात बांधलेल्या बंगल्यात गोव्यात विक्रीसाठी मर्यादित असलेला अवैध विदेशी दारूचा साठा असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर कार्यालयास मिळाली होती. ब विभागाचे निरीक्षक सदानंद मस्करे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री करून हिरज येथे संबंधित शेतघरावर धाड टाकली. त्यावेळी संपूर्ण शेतघर बंद होते. तेथील एका खोलीची तपासणी केली असता तेथे विविध कंपन्यांचा विदेशी दारुसाठा सापडला. हा व्हिस्की दारूचा साठा केवळ गोव्यात विक्री करण्यासाठी मर्यादित होता. अन्य राज्यात त्याची विक्री करण्यास कायदेशीर मनाई आहे.
हेही वाचा – सातारा : पाचगणी येथे वऱ्हाडाचा टेम्पो उलटून २५ जखमी
राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत निरीक्षक सदानंद मस्करे व संभाजी फडतरे यांच्यासह दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर यांच्या पथकाने भाग घेतला होता. अवैध दारूचा जप्त केलेला साठा कोणी आणून ठेवला, दारूचा साठा ठेवण्यात आलेले बंद शेतघर कोणाच्या मालकीचे आहे, याचा तपास केला जात आहे.