सांगली : पोलीसांच्या रात्रगस्तीच्यावेळी संशयावरुन दुचाकी चालकाची झडती घेतली असता कासव तस्करी उघड झाली. वन विभागाने तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत माहिती अशी, सोमवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील गस्तीसाठी फिरत असताना एक तरुण दुचाकीवरुन निघाला होता. त्याची तपासणी केली असता पिशवी मध्ये कासव आढळून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> “भाजपाने सहा कंत्राटदारांना महाराष्ट्र विकला”, प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

त्यांनी पंचनामा करून दुचाकी वाहन व कासव जप्त केले. आणि याबाबत वनविभागाशी संपर्क करुन कारवाई बद्दल सांगितले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून दुचाकी वाहन (एमएच १० एडी ५६१४) ताब्यात घेतले व वन्यजीव कायदा १९७२ अंतर्गत वन गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरु आहे. संशयित आरोपीचे नाव गणेश दिलीप पवार (वय २२ रा. मोळे) असे आहे.