सावंतवाडी : कर्नाटक राज्यातील खानापूर येथे हत्ती पकड मोहीम यशस्वी झाली होती, त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात तिराळी पंचक्रोशीतील रानटी हत्तीना पकडा व आमची या त्रासातून मुक्तता करा अन्यथा येत्या १० फेब्रुवारी पासून वनविभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण छेडण्याचा इशारा सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांच्या नेतृत्वाखाली पांचक्रोशीतील सरपंच व उपसरपंच यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे, केर, मोर्ले, तेरवण- मेढे, घोटगेवाडी, पाळये, सोनावल, कोनाळ, परमे, घोटगे आदी गांवात मोठ्या प्रमाणात हत्ती प्रश्न आहे. येथील शेतकऱ्यांना मागील अनेक वर्षे हत्ती संकटाने ग्रासले आहे. हाता तोंडाशी आलेला हंगामी पिकाचा घास ह्या हत्तीच्या तोंडाशी जातो आणि इथला शेतकरी उपाशी मरतो याकडे वनविभागाचे कायमच दुर्लक्ष होतं आहे. यासाठी जशी हत्ती पकड मोहीम कर्नाटक राज्यातील खानापूर तालुक्यात राबवली तशीच मोहीम दोडामार्ग तालुक्यातील या हत्ती प्रवण क्षेत्रात राबवावी अशी मागणी सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रविण गवस यांच्या नेतृत्वाखाली या पंचक्रोशीतील सरपंचांनी वनविभागाकडे केली.

येत्या ९ फेब्रुवारी पर्यंत याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास या भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावातील ग्रामस्थ यांचे १० फेब्रुवारी पासून साखळी उपोषण करू असा इशारा सदरच्या निवेदनाद्वारे दिला आहे.