न्यायालयाचा अधिस्थगन आदेश असतानाही बेसुमार वृक्षतोड होत आहे. वनखात्याने वृक्षतोडीकडे कानाडोळा चालविला असतानाच वन्यप्राणी हत्या उघड होऊनही वनखाते सुस्तावले असल्यासारखे वागत आहे. अधिकारी साइटवर जात असल्याचे सांगून भलतीकडेच जात असल्याच्या तक्रारी आहेत.
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांत बेसुमार वृक्षतोड होत आहे. या दोन्ही तालुक्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा अधिस्थगन आदेश लागू आहे. शिवाय या आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाने जिल्ह्य़ासाठीही केली आहे. त्यामुळे लाकूडतोडीचा व्यवसाय करणाऱ्यांत प्रचंड नाराजी आहे.
वनसंज्ञा व अधिस्थगन आदेश असतानाही बेसुमार वृक्षतोड होत आहे. वनसंज्ञेतील जमिनीत केरळीयांनी बेसुमार वृक्षतोड केली आहे. तेथे केरळीयांनी अननस, रबर व अन्य बागायती केलेल्या आहेत. या बेसुमार वृक्षतोडीबाबत लोकांनी तक्रारी करूनही वनखाते सुस्तावल्यासारखे गप्प आहे.
लोकांच्या तक्रारी असूनही खासगी जंगलातील झाडतोडीला वनखाते प्रोत्साहन देत आहे. या पास कामासाठी सवलतही मिळत असल्याचे सांगण्यात येते. केरळीय शेतकऱ्यांपैकी काही केरळीयांनी गवा रेडय़ाची शिकार करून मटण गोवा, केरळ, कर्नाटक भागांत विक्रीही केले. गवा रेडा हत्याप्रकरणी दोघा केरळींना मांस साफ करताना रंगेहाथ पकडूनही वनखाते शांत आहे. तो तपासही थंडावला आहे.
बेसुमार वृक्षतोडीमुळे वन्यप्राणी सैरावैरा पळत आहेत. त्यांना ठार मारून त्यांचे मांस मागणीप्रमाणे गोवा, कर्नाटक व केरळ राज्यांत निर्यात केले जात आहे. तसेच अननसाच्या बागेतून सापांचे विष काढले जात आहे. या साऱ्या प्रकारांकडे वनखाते डोळसपणे पाहत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
उपवनसंरक्षक किंवा वनक्षेत्रपाल कार्यालयातील सर्व अधिकारी साइटवर गेल्याचे सांगण्यात येते, पण ते सर्व बाहेरगावी असतात, असे बोलले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा