Santosh Deshmukh Murder Case Highlights : बीडमधील मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी काल उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून फरार आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याला अटक केली. त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी प्रयागराज येथील स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर बीड पोलीस त्याला महाराष्ट्रात घेऊन येत आहेत. खोक्या भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा सहकारी असल्याचा आऱोप आहे. तो मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत खून करण्याचा प्रयत्न आणि इतर प्रकरणांमध्ये हवा आहे. यादरम्यान खोक्या भोसले याच्या वन विभागाच्या जमिनीवर केलेल्या अनाधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. या घडामोडी आपण येथे जाणून घेणार आहोत.
Satish Bosale Forest Department Action Highlights : खोक्या भोसले याच्या घरावर वनविभागाने केलेल्या कारवाईच्या सर्व अपडेट वाचा एका क्लिकवर
कोण आहे खोक्या भोसले?
खोक्या उर्फ सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असू
गोल्डमॅन म्हणूनही त्याची स्थानिक पातळीवर ओळख आहे. शिरुर कासार परिसात खोक्याची दहशत असून तिथे त्याला खोक्या पार्टी असे म्हटले जाते. व्हिआयपी कल्चर, व्हिआयपी कार, हातात सोन्याचे ब्रेस आणि कडे, तसंच गळ्यात सोन्याची माळ असल्याने त्याला गोल्डमॅन म्हटलं जातं.
सतीश भोसले हा उंची आणि लॅव्हिश आयुष्य जगतो. त्याचा हेलिकॉप्टरमधून उतरत असतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. तसंच दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले हा कारमधून पैसे उधळताना दिसतो आहे. सतीश अर्थात खोक्या भोसलेची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे असंही दिसतं आहे. मागच्या सहा ते सात वर्षांपासून खोक्या भोसले राजकारणात सक्रीय आहे. सतीश भोसले हा बीडच्या शिरुर शहराजवळ पारधी वस्तीत राहतो.
भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि बीडमधील कुख्यात गुंड सतीश उर्फ खोक्या भोसले याला बुधवारी (१२ मार्च) बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक केली आहे. एका इसमाला अर्धनग्न करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी खोक्यावर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार होता. गेल्या सहा दिवसांपासून पोलीस त्यचा शोध घेत होते. अखेर पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रॅक केलं आणि थेट प्रयागराज गाठलं. तिथेच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर खोक्या भोसलेविरोधात कारवाईने वेग घेतला आहे. शिरूर कासार येथील त्याच्या घरावर वनविभागाने बुलडोझर फिरवला आहे. वनविभागाच्या जागेवर बांधलेलं हे घर जमीनदोस्त करण्यात आले आहे.
Beed Police arrested Satish Bhosale, alias Khokya Bhosale, a wanted accused from Prayagraj, UP, yesterday, in connection with assault cases in Beed. He will be produced before a local court in Prayagraj for transit remand.
— ANI (@ANI) March 13, 2025
Khokya Bhosale is an alleged close aide of BJP MLA… pic.twitter.com/RSwyCCZklx