Former Chairman of Tata Sons Died in Car Accident in Mumbai: टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीवरील पुलावरील दुभाजकावर कार आदळून हा अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हा अपघात नेमका कसा घडला? याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिली आहे. संबंधित प्रत्यक्षदर्शी अपघातस्थळापासून काही अंतरावर असणाऱ्या एका गॅरेजमध्ये काम करतो. त्याने दिलेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री यांची कार एक महिला चालवत होती. ही कार डाव्या बाजुने अन्य एका कारला ओव्हर टेक करत होती. याचवेळी पुलावर असणाऱ्या दुभाजकाला ही कार धडकली. या घटनेत सायरस मिस्त्री यांच्यासह अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला. चालक महिला जखमी होती, त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. अपघात घडल्यानंतर ५ ते १० मिनिटांनी लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
PM Narendra Modi and Manmohan singh
Dr. Manmohan Singh Passed away: डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
Lamborghini Catches Fire
Lamborghini Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर ‘लॅम्बोर्गिनी’ला आग; उद्योगपती गौतम सिंघानियांनी Video केला पोस्ट

हेही वाचा- Cyrus Mistry Death : सुप्रिया सुळे म्हणाल्या “माझा भाऊ गेला”, उद्योगपती हर्ष गोयंकांनीही व्यक्त केलं दु:ख, म्हणाले…

पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. अपघातात दोघे जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ही मर्सिडीज कार होती. गाडीचा क्रमांक MH-47-AB-6705 असा आहे.”

सुप्रिया सुळे हळहळल्या
सुप्रिया सुळेंनीही सायरस मिस्त्री हे किती साधे होते याच्या आठवणी सांगितल्या. ताज हॉटेलमध्ये पती सदानंद सुळे व सायरस मिस्त्री जेवायला गेले असता तिथल्या कर्मचाऱ्यांना वाटलं सदानंद हेच सायरस आहेत. ते जेव्हा म्हणाले आम्ही तुमच्या स्वागताला आलोय, तेव्हा आम्ही सांगितलं हे सदानंद आहेत व तो सायरस आहेत. इतका लो प्रोफाइल व साधा माणूस होता तो. पाणीपुरी, साबुदाणा खिचडी करा असं सांगून ते आमच्या घरी हक्कानं येत असत, असं सांगताना सायरस यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर विश्वासच बसत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

Story img Loader