महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने सोमवारी उशिरा त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे हिंदुजा रुग्णालयातून बाहेर पडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक आहेत. त्यांना जोशी सर असंही संबोधलंं जातं. मनोहर जोशी यांचं वय ८६ वर्षांचं आहे. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरु केली होती. १९७६ ते १९७७ या काळात ते मुंबईचे महापौरही झाले. तर शिवसेना भाजपाच्या युतीचं सरकार जेव्हा १९९५ मध्ये आलं तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्रीही झाले होते. मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर आहे असं समजतं आहे. हिंदुजा रुग्णालयाकडून लवकरच त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात येणार आहे.

गेल्या काही काळापासून राजकारणात मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते. मनोहर जोशींनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यपदही भुषवलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former chief minister manohar joshi admitted to hinduja hospital uddhav thackeray visited the hospital scj