“महाविकास आघाडीचं सरकार ही अशी ट्रेन आहे मागे आणि पुढे एक इंजिन आहे. तसंच त्याला मध्येही एक एक इंजिन आहे. ही तिन्ही इंजिन वेगवेगळ्या दिशेला जात आहे, त्यामुळे ही ट्रेन नक्की कोणत्या दिशेला जात आहे हे समजत नाही,” असं मत विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तसंच राज्यात ठाकरे सरकारमध्ये काही स्वयंघोषित मुख्यमंत्रीदेखील आहेत. हे सरकार अंतर्विरोधानंच पडेल असंही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा- ठाकरे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप – देवेंद्र फडणवीस

“या सरकारमध्ये स्वयंघोषित मुख्यमंत्रीही आहे. तसंच अनेक स्वयंघोषित नेतेही आहे. या सरकारचं नक्की स्टेअरिंग कोणाच्या हाती आहे हा संशोधनाचा विषय. नेमकं स्टेअरिंग कोणाच्या हाती हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ठरवावं,” असंही फडणवीस म्हणाले. “मी कोणालाही फुकटचे सल्ले देत नाही. राज्याच्या हितासाठी मी सल्ले देतो. त्यांनी त्या घ्यायचे असतील तर ते घेतील. आजपर्यंत माझ्या कोणत्याही पत्रांना उत्तर आलेलं नाही. पण गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यावर कारवाई होताना दिसत आहे. पण यात नाव घेतलं जात नाही. सुरूवातीच्या काळात एकदाच मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता.त्यानंतर कधीही आला नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- राज ठाकरे म्हणाले, “आताही सांगतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही, कारण…”

“मी विरोधीपक्ष नेता आहे म्हणून उगाच टीका करायची म्हणून करत नाही. मी ज्या ठिकाणी करायचा तिकडेच विरोध केला नाही. हे ऑटोरिक्षा सरकार आहे. रिक्षाची गती मर्यादित असते. तिच्या क्षमता मर्यादा आहेत. तसंच या सरकारचं आहे. सरकारमधील तिन्ही पक्षांचे विचार वेगळे. मुख्यमंत्री हे केवळ प्रशासनावर अवलंबून आहेत. हे चुकीचं आहे असं नाही. जी अपेक्षा त्यांच्याकडून आहे ती पूर्ण होत नाही. ते पावलं सावरून टाकतात. पहिल्यांदा ते मुख्यमंत्री झाले आहेत हे मान्य आहे. पण आता बऱ्याच महिन्यांचा काळ लोटला आहे. राज्याच्या अधिकाऱ्यांमध्ये निरनिराळे मत प्रवाह असतात. त्यातून राज्याच्या प्रमुखांनी मार्ग काढायचे असतात,” असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cm devendra fadnavis criticize mahavikas aghadi government slams cm uddhav thackeray jud