Former CM Prithivraj Chavan on Delhi Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून देशभरात वातावरण तापलं आहे. दिल्ली विधानसभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीत फूट पडली असून आप आणि काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवणार आहेत. दरम्यान, यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी धक्कादायक विधान केलं होतं. या विधानावर आता त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.

IANS ला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, “दिल्लीच्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत. मला विश्वास आहे की तिथे अरविंद केजरीवाल जिंकतील. काँग्रेसही रिंगणात आहे आणि निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस आणि आपमध्ये युती व्हायला हवी होती. मात्र तसे होताना दिसत नाही”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Ration Card
Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘ही’ सेवा झाली बंद; काय होणार परिणाम? वाचा!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
What Aditya Thackeray Said?
Aditya Thackeray : “…तर आम्हीही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करु”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर असं का म्हणाले आदित्य ठाकरे?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”

त्यांच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वक्तव्यवर खुलासा केला आहे. काँग्रेसकडूनही त्यांच्यावर टीका झाली. ते म्हणाले, “दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. इंडिया आघाडी एकत्र लढली असती तर आघाडीचा विजय निश्चित झाला असता. आता सर्व प्रमुख पक्ष रिंगणात उतरल्याने खुली निवडणूक झाली आहे. काँग्रेस पक्षाला प्रचंड गती मिळाली आहे आणि मला खात्री आहे की आपण विजयी होऊ.”

अरविंद केजरीवाल यांना विरोधी इंडिया आघाडीतील दोन प्रमुख पक्ष समाजवादी पक्ष आणि तृणूल काँग्रेस यांचा पाठिंबा मिळाला आहे. सप प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, जो कोणी भाजपाचा पराभव करेल आम्ही त्यांच्यासोबत आहोत. दिल्लीत काँग्रेसची संघटना मजबूत नाही, त्यामुळे सपा आपला पाठिंबा देईल. तृणमूल काँग्रेसनेही आपला पाठिंबा देत म्हटलं की, आशा आहे की केजरीवाल दिल्लीत पुन्हा सरकार स्थापन करेल.

काँग्रेस दिल्लीत युतीशिवाय निवडणूक लढवत आहे.२०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब होती आणि यावेळीही त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. आपला सपा आमि टीएमसीचा पाठिंबा मिळाल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे महाआघाडीतही काँग्रेसच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ममता बॅनर्जी, शरद पवार आणि लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या नेत्यांचं म्हणणं आहे की आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडून काढून घेऊन ममता बॅनर्जींकडे सोपवले पाहिजे.

दिल्लीत निवडणुका कधी

दिल्लीत ७० जागांवर ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. येथे भाजपा, आप आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. गेल्यावेळी आपने दिल्लीत दणदणीत विजय मिळवला होता. मात्र यावेळी कोणाचा विजय होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader