Uddhav Thackeray Vs Rane Family : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आधी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि काल मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यामध्ये महायुतीतील ३९ आमदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपाच्या वाट्याला २० मंत्रिपदे आली आहेत. या २० जणांमध्ये कणकवलीचे आमदार नितेश राणे यांचाही समावेश आहे.

दरम्यान काल नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कुडाळ-मालवण मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार आणि त्यांचे भाऊ निलेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, “राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा”, असे म्हणत टोला लगावला आहे.

Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…”
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackray?
Devendra Fadnavis : “चंद्रपूरचे आपण सगळेच वाली! कुणीही सुग्रीव नाही, मी कुणासारखा जोक…”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला?
What Aditya Thackeray Said?
Aditya Thackeray : “…तर आम्हीही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करु”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर असं का म्हणाले आदित्य ठाकरे?

उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय…

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामधून शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश करत कुडाळ-मालवणमधून विजयी झालेल्या निलेश राणे यांनी नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपत घेतल्यानंतर एक्सवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, “श्री. उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागला नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली.

राणेंना संपवता संपवता…

आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, “राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा…
आता तरी कुणाशीही कपटीपणाने वागू नका, तुम्हाला मी शुभेच्छा देतो कारण पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठीण होईल. जय महाराष्ट्र!

हे ही वाचा : “पोलीस व्यवस्थेने बळी घेतला”, सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूनंतर जितेंद्र आव्हा…

शिवसेनेकडून १९९५ मध्ये मुख्यमंत्री झालेल्या खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंशी झालेल्या वादामुळे २००५ मध्ये शिवसेना सोडली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पुढे २०१९ मध्ये राणे कुटुंबीयांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर नारायण राणे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातही काम करायची संधी मिळाली होती. सध्या नारायण राणे खासदार, नितेश राणे भाजपाकडून मंत्री तर निलेश राणे शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) आमदार आहेत.

Story img Loader