महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. ६३ वर्षे झाली, मराठी माणसाने आणि महाराष्ट्राने मुंबई ही आपली राजधानी मिळवली. ही आंदण म्हणून मिळालेली राजधानी नाही ही आपण सगळ्यांनी लढा देऊन मिळवलेली राजधानी आहे असंही उद्धव ठाकरे यांनी बी.के.सी येथील वज्रमूठ सभेत सांगितलं. १ मेच्या मध्यरात्री मी हुतात्मा चौकात गेलो होतो. आम्ही पोहचलो तोपर्यंत कुणीही तिथे पोहचलेला नव्हता. आज सकाळी गेले असतील मिंधे. क्रियाकर्म म्हणून करायचं म्हणून जायचं आणि मानवंदना देऊन यायचं. गेलेच असतील जाणार कुठे? मात्र मिंध्यांना मला एक सांगायचं आहे की या लोकांनी लढा दिला नसता तर गद्दारी करून का होईना तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला नसता. तसंच गद्दारी करुन मिळालेल्या खुर्चीचा उपयोग फक्त बुड टेकायला करु नका, महाराष्ट्रावरचा अत्याचार सहन करू नका असं म्हणत एकनाथ शिंदेंना खडे बोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहेत.
“मिंधेंनी गद्दारी करुन मिळालेल्या खुर्चीचा उपयोग फक्त बुड टेकायला…” वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात
मुंबई आपल्याला आंदण म्हणून मिळालेली नाही, लढा देऊन ती आपल्याला मिळाली आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-05-2023 at 21:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cm uddhav thackeray slams cm eknath shinde and said he is traitor scj