प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा सुपूत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यातील इतर समारंभाची देशभर प्रचंड चर्चा आहे. रोज नियमितपणे त्यांच्या निवासस्थानी अँन्टिलियावर किंवा जिओ वर्ल्ड सेंटर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण देण्यात येत आहे. त्यामुळे, हे कार्यक्रम चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. दरम्यान, काल रात्री झालेल्या संगीत सोहळ्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चिरंजीव तेजस ठाकरे यांनीही हजेरी लावली होती. त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यावरून भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

या कार्यक्रमाला ओरी, सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, शिखर पहारिया, वीर पहारिया, तेजस ठाकरे यांनी “ये लडकी है अल्लाह” या गाण्यावर नृत्य केलं. या नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आता राजकीय वादाला फोडणी मिळाली आहे.

sanjay raut on raj thackeray
Sanjay Raut: ‘राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे माफ करणार नाहीत’, प्रॉपर्टीच्या विधानावरून संजय राऊत यांची टीका
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 Live : उद्धव ठाकरेंना…
Petrol Diesel Price Today On 5th November
Petrol Diesel Price Today : आज पेट्रोल-डिझेल किती रुपयांनी झालं स्वस्त? तुमच्या शहरांतील इंधनाचा दर इथे चेक करा
tasgaon vidhan sabha money with Diwali faral
सांगली: दिवाळी फराळासोबत पैशांचे वाटप; तासगावमध्ये १ लाख रुपये जप्त
khanapur vidhan sabha
सांगली, जत, खानापूरमध्ये बंडखोरी; अन्यत्र आघाडी – महायुती लढत
What Devendra Fadnavis Said About Brahmin Cast
Devendra Fadnavis : ‘ब्राह्मण असणं राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरतंय का?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जात…”
sangli vidhan sabha 2024
बंडखोरीने सांगलीतील तीन लढती लक्षवेधी!
pandharpur vitthal darshan
कार्तिकी वारीनिमित्त विठ्ठलाचे २४ तास दर्शन ! सावळ्या विठुराया भक्तांसाठी उभा
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचं धोरण…”

“जो मराठी तरुण “गोविंद रे गोपाळा” म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही.. ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत. जो होळीला “आयना का बायना..” म्हणताना कधी दिसला नाही. “गणा धाव रे… मला पाव रे..” म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही.. तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला…!”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

ते पुढे म्हणाले, “हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात “धकधक” झाले. असो.. हे नृत्य पण कसे “जगविख्यात, गरजेचे आणि जीवनावश्यक..वगैरे वगैरे आहे, हे आता त्या तरुणाचे “संजयकाका” महाराष्ट्राला पटवून देतीलच…!”

“अरे… अंबानींच्या लग्नातला हा background डान्सर ओळखीचा दिसतोय… हे तर टोमणे सम्राटांचे छोटे चिरंजीव, तेजस ठाकरे … उत्तम कला आहे एकेकाजवळ … वडील नटसम्राट … लेक नृत्यसम्राट…”, अशी टीका शिंदे गटाच्या महिला नेत्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला नेल्यावरून आदित्य ठाकरेंनी सातत्याने सरकारवर तोफ डागली आहे. तर, इंडिया आघाडीतील नेतेही संसदेत अंबानी-अदाणी प्रकरणावरून केंद्र सरकारला घेरत असतात. एकीकडे राजकीय विरोध दाखवून दुसरीकडे कौटुंबिक नातेसंबंध जपत असल्याची टीका आता उद्धव ठाकरेंवर होऊ लागली आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओवर अद्यापही ठाकरे गटाची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.