छत्रपती संभाजीनगर – नाशिक, अहमदनगरमधून अडवून धरलेले मराठवाड्याच्या हक्काचे ८.४ टिएमसी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जालना रोडवरील आकाशवाणीजवळच्या गोदावरी विकास महामंडळासमोर तीन तास रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) राजेश टोपे, अजित पवार गटाचे माजी आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल आदींवर जवाहरनगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील नेत्यांसह धनश्री तडवळकर, पांडुरंग तांगडे पाटील यांच्यासह ३१ जणांवर व अनोळखी शंभर ते दीडशे आंदोलकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार गोकुळ बाबूलाल लोदवाल यांनी तक्रार दिली आहे. रस्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणून वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा