सांगली : अफझलखान वधाच्या दिनीची जावळी खोर्‍यातील शिवप्रताप भूमी मुक्त करण्याचे काम होत आहे. गेली वीस वर्षे सुरू असलेल्या शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या लढ्याला हिंदूत्ववादी सरकारच्या भूमिकेमुळे यश आले असल्याचे आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी गुरूवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

गेली २१ वर्षे सुरू असलेल्या आंदोलनाचा आढावा घेत असताना श्री. शिंदे म्हणाले, विधानपरिषदेचा सदस्य असताना ज्या ठिकाणी अफझलखान व सय्यद बंडा यांच्या कबरी आहेत, त्या ठिकाणी वन व महसूल खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण करून दर्गा व मशिद उभारली असून या ठिकाणी अफझलखान वधाच्या दिवशी उरूस भरविण्यात येत असल्याचे पत्र आपणास आले होते. या ठिकाणी असलेल्या मुजावरच्या अंगात अफझलखान येतो आणि शिवाजीने दगा दिया असे ओरडत असल्याचे या पत्रात म्हटले होते. सय्यद बंडा अफझलखान नावाची विश्‍वस्त  संस्था महाराष्ट्रात  कशी स्थापन होउ शकते असा सवाल विधानपरिषदेच्या पटलावर उपस्थित केला. यावेळी समिती नियुक्तीचा निर्णय तत्कालिन सरकारने घेतला.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

हेही वाचा >>> Afzal Khan Grave: साताऱ्यात अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात, प्रतापगडाच्या पायथ्याशी चोख बंदोबस्त

या समितीने केलेल्या पहाणीवेळी कबरीच्या परिसरातील वन व महसूल विभागाच्या जमिनीवर अतिक्रण करून दर्गा व मशिद उभारण्यात आली असल्याचे आढळून आले. कबरीवर फुलांच्या माळा, चांदीचे पाळणे, चंदन दरवाजे असल्याचे आढळून आले होते. जिल्हा प्रशासनाने हे सर्व जप्त केले. वादग्रस्त जागा सिल केली. मात्र, वादग्रस्त बांधकाम पाडावे यासाठी आंदोलन सुरूच ठेवावे लागले. दहा दिवसापुर्वी सरकारला वादग्रस्त बांधकाम पाडावे, अफझलखानाचे उदात्तीकरण थोपवावे अन्यथा, शिव प्रताप भूमी मुयती आंदोलनाच्यावतीने अनाधिकृत बांधकाम पाडण्याचा इशारा देण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत शिवप्रतादिनीच अवैध बांधकाम पाडण्यास सुरुवात केली याचा शिवभक्तांना आनंद आहे. दहशतवादाविरुध्द लढण्यासाठी शिव प्रताप भूमी प्रेरणास्थान आहे. यामुळे सामान्यांना पाहण्यासाठी खुले करावे आणि अफझलखान वधाचे शिल्प उभा करावे असेही श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

Story img Loader