सांगली : सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच कायम असताना ओबीसी बहुजन पार्टीच्यावतीने माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा शेंडगे यांनी केली.सांगलीमध्ये पार पडलेल्या ओबीसी बहुजन सत्ता संपादन मेळाव्यामध्ये शेंडगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला असून त्यांच्याशी ओबीसी बहुजन पार्टी यांची आघाडी करण्यात येत असल्याचे श्री.  शेंडगे यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा देखील ओबीसी बहुजन पार्टीला असल्याचे यावेळी शेंडगे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतल्या नाराज काँग्रेसने आपल्याला पाठिंबा द्यावा, आपण महाराष्ट्रातल्या इतर लोकसभेच्या ठिकाणी काँग्रेसच्या ओबीसी उमेदवाराला पाठिंबा देऊ, अशी भूमिका देखील शेंडगे यांनी स्पष्ट केली आहे.

हेही वाचा >>>लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेडीरेकनर दर ‘जैसे थे’

सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना यांच्यात अजूनही चुरस सुरू असून ठाकरे शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर आता मेत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. शेंडगे यांनी अखेरच्या दहा दिवसात जत विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दाखल करून आमदारकी मिळवली होती.

Story img Loader