सावंतवाडी: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोकणाने पक्षाच्या रूपात मोठ्या प्रमाणात ताकद दिली होती. परंतु सध्या काहींनी ठाकरे शिवसेनेला धक्का दिला असतांनाच आज माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मी साथ सोडणार नाही असे म्हटले आहे. या दरम्यान बोलताना श्री नाईक म्हणाले,नवी उमेद आणि नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्षा बांधणी करु असे त्यांनी सांगितले आहे.

राजापूरचे माजी आमदार राजन साळवी, रत्नागिरी चे माजी आमदार सुभाष बने तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही पदाधिकारी शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत वातावरण ढवळून निघाले आहे.

माजी आमदार वैभव नाईक यांना एसीबीच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. तरीही नाईक यांनी आपण उध्दव ठाकरे यांची साथ सोडणार नाही असे म्हटले आहे. आज त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र या चर्चेतील तपशील समजू शकला नाही. वैभव नाईक यांनी आपण उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष नव्याने बांधणी करण्यावर भर देत आहे असे म्हटले आहे.

शिवसेना शिंदे गटात वैभव नाईक प्रवेश करतील अशी अटकळ लोकसभा, विधानसभा निवडणुकी पुर्वी बांधली जात होती. मात्र ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहीले. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात दोन वेळा प्रतिनिधित्व त्यांनी केले. तिसऱ्यांदा ते विजयी झाले नाहीत. या पराभवानंतर प्रथमच ते मातोश्रीवर दाखल झाले.माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे ते कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.

Story img Loader