मनसेचे पुण्यातले प्रबळ नेते वसंत मोरे अशी ओळख असलेल्या वसंत मोरेंनी मागच्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला. आपण आपल्या परतीचे सगळे दोर कापून टाकले आहेत असंही वसंत मोरेंनी म्हटलं. तसंच मनसे सोडताना त्यांनी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांवर काही आरोप केले. त्यांना पक्ष सोडताना अश्रू अनावर झाले होते. पक्ष सोडल्यावर वसंत मोरे शरद पवारांसह जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र वसंत मोरेंनी तुतारी फुंकली नाही. आता वसंत मोरे यांची दिशा ठरली आहे अशा चर्चा आहेत. याचं कारण आहे त्यांची एक्स या सोशल मीडिया हँडलवरची पोस्ट.

पक्ष सोडताना काय म्हणाले होते वसंत मोरे?

“मी मागची २५ वर्षे सुरुवातीच्या कालावधीत शिवसेनेत राज ठाकरेंसह काम केलं. पुणे शहरांतला मी पहिला कार्यकर्ता त्यावेळी होतो. आजपर्यंत राज ठाकरेंसह होतो. मात्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य पदाचा आणि इतर सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. मागच्या दीड वर्षापासून मी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र माझ्याविरोधात कारवाया वाढल्या. इच्छुकांची यादी पक्षातली वाढली. ज्या लोकांवर पुणे शहराची जबाबदारी होती त्या लोकांनी जो अहवाल केला त्यात पुणे शहर मनसेची स्थिती नाजूक आहे अशा गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहचवल्या. नकारात्मक अहवाल माझ्याविरोधात पाठवण्यात आला. तेव्हापासून पुण्यात मनसे लोकसभा लढवू शकत नाही असं त्यातून सांगण्यात आलं.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे पण वाचा- वसंत मोरे यांनी डोकं शांत ठेवून निर्णय घ्यावा : आमदार रविंद्र धंगेकर

मी परतीचे दोर कापले आहेत

“मी एकनिष्ठ राहिलो पण माझ्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. मी ज्यांच्यासह १५ वर्षे घालवली तेच लोक वसंत मोरेला तिकिट मिळू नये म्हणून अहवाल पाठवत असतील तर काम कसं करणार? त्यामुळे मी सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. मी परतीचे दोर कापले आहेत. मी सामान्य कार्यकर्त्यांशी बोललो, पण नेत्यांचा फोन घेतला नाही. हे बोलताना वसंत मोरेंना अश्रू अनावर झाले. मी अशा लोकांमध्ये कसा काय राहणार?”

वसंत मोरेंची पोस्ट काय?

ही सगळी भूमिका मांडल्यानंतर दोन दिवसांनी वसंत मोरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी वसंत मोरे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा रंगली. मात्र तसं काही घडलं नाही. आता वसंत मोरेंनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी ‘एक नवी दिशा जी माझ्या पुण्याच्या हिताची असेल…’ असं कॅप्शन दिलं आहे. त्याचे विविध अर्थ काढले जात आहेत.

वसंत मोरे यांना नेमकं काय म्हणायचं आहे? ते या पोस्टमधून समजू शकलेलं नाही. मात्र वसंत मोरेनी फोटोला दिलेलं कॅप्शन सूचक आहे. कुठे जायचं हे त्यांचं ठरलं आहे. त्यामुळेच त्यांनी नवी दिशा असं म्हटलेलं दिसतं आहे. आपल्याला सगळ्याच पक्षांकडून ऑफर आहे असंही वसंत मोरेंनी स्पष्ट केलं होतं. आता ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader