आदित्य ठाकरेंना मंत्री केलं तेव्हाच एकनाथ शिंदेंना पोटदुखी झाली असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे . जालन्यात शिवगर्जना मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या. धर्मवीर सिनेमा बनवून सिम्पथी मिळवण्याचं काम मिंधेंनी केलं. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी इंटरव्हलनंतर धर्मवीर सिनेमा पाहिला नाही. यावेळी आदित्य ठाकरेंना जेव्हा मंत्री केलं तेव्हा खऱ्या अर्थानं यांना पोटदुखी झाली असल्याचं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं.

शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आम्ही संपर्क करतो आहोत असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे म्हणजे राम आणि श्याम आहेत असं वक्तव्य ओवैसी यांनी केलं होतं. त्यावरही किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलं. ओवैसी काय म्हणतात ते मला महत्त्वाचं वाटत नाही. पक्षात असताना ते राम आणि श्यामच होते. पण ते नातं कुणी बिघडवलं हे सगळ्यांना माहित आहे असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Sanjay Raut On MNS chief Raj Thackeray Uddhav Thackeray meet
Udhhav Thackeray-Raj Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार? भूमिका स्पष्ट करत राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे त्यांचे…”
Eknath Shinde Shivsena Reaction on Raj Uddhav Meet
Raj Uddhav Meet : राज ठाकरे-उद्धव ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, “ते दोघं एकत्र….”
Eknath Shinde On Uddhav Thackeray
Eknath Shinde : “काहीजण आमदारकी वाचवण्यासाठी…”, उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Santosh Deshmukh Wife Crying
Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या पत्नीची साश्रू नयनांनी मागणी, “मुख्यमंत्र्यांनी..”

आनंद दिघे यांच्याविषयी आमच्या मनात खूप आदर आहे. आम्ही जवळून आनंद दिघेंना पाहिलं आहे. दोन-तीन निवडणुका त्यांच्यासोबत आम्ही काम केलं आहे. मात्र आनंद दिघेंचं नाव घेऊन, आनंद दिघेंच्या आयुष्यात न घडलेल्या गोष्टी सिनेमातून दाखवून मिंधेंनीच केल्या. उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या त्यामुळेच इंटरव्हलनंतर उद्धव ठाकरे उठून गेले. उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना मुलगा आहे म्हणून तिकिट दिलं नाही. आदित्य ठाकरेंनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. त्यांनी किती कष्ट घेतले ते आम्हाला माहित आहे असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. सर्वांच्या आग्रहाखातर आदित्य ठाकरेंना तिकिट देण्यात आलं. त्यानंतरही आदित्य ठाकरेंनी जे काम केलं त्यामुळेच त्यांना मंत्रीपद दिलं.

आदित्य ठाकरेंना मंत्री केलं आणि एकनाथ शिंदेंच्या पोटात दुखू लागलं. आदित्य ठाकरे हे चाणाक्ष आहेत असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

Story img Loader