सावंतवाडी शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निष्ठावंत होते. त्यांना शिवसेनेने विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली होती. दरम्यानच्या काळात ते राज ठाकरे यांच्या मनसेत सक्रिय होते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मनसे चा राजीनामा दिला होता.

उपरकर यांनी शिवबंधन बांधले तेव्हा यावेळी शिवसेना नेते आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार विनायक राऊत, संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, संजय पडते, संग्राम प्रभुदेसाई आदी उपस्थित होते.

हे ही वाचा…“५० हजार खर्चून निवडणुकीतील मतदान आपल्याकडे वळवा”, प्रकाश आंबेडकरांचा अधिकाऱ्यांना सल्ला

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने विधानपरिषद सदस्य झालेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांनी तब्बल १२ वर्षांनी पुन्हा ठाकरे शिवसेनेत स्वगृही प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर उपरकर यांनी केलेला पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. उपरकर यांच्यासह त्यांचे समर्थक आशिष सुभेदार, बाबल गावडे, दीपक गावडे, अप्पा मांजरेकर, राजेश टंगसाळी, विनोद सांडव, नाना सावंत आबा चिपकर, शैलेश मयेकर, मंदार नाईक, अभय देसाई, प्रकाश साटेलकर, सुरेंद्र कोठावळे, मनोज कांबळी, यांनीही ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.