सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर पुन्हा एकदा घणाघाती टीका करण्यात आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. पॉर्न स्टारला पैसे दिल्याच्या आरोपात ही कारवाई झाली. अशी कारवाई झालेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष आहेत.याच घटनेचा उल्लेख करत सामनातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. उद्या डोनाल्ड ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील. ट्रम्प यांचे सूटबूट भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जातील अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे सीबीआयला भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात खुली सूट दिली आहे. सीबीआयच्या स्थापनेदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयला सांगितलं की ताकदवान भ्रष्टाचाऱ्यांवर न भिता कारवाई करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण गांभीर्याने घ्यायचे की टाळ्या वाजवून सोडून द्यायचे? असा प्रश्न सोहळ्यातील उपस्थितांना पडला असेल. भ्रष्ट व्यक्ती कितीही शक्तिशाली असली तरीही तिच्या विरोधाला न घाबरता कारवाई करा. अशा सूचना मोदी यांनी दिल्या आहेत तरीही सीबीआय म्हणजे मोदी-शाह यांच्या पिंजऱ्यातला पोपट आहे याबाबत कुणाच्याही मनात शंका नसावी.

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray says Obstruction of projects so people will not support him
“उद्धव ठाकरेंकडून प्रकल्पांची अडवणूक, जनता त्यांना थारा देणार नाही…” देवेंद्र फडणवीसांची टीका
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”

सीबीआय म्हणजे मोदी आणि शाह यांच्या पिंजऱ्यातील पोपट

एकेकाळी सीबीआय म्हणजे काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. आता काँग्रेसची जागा भाजपाने घेतली आहे. सीबीआयचा पोपट मालक सांगेल त्याप्रमाणेच विठू विठू किंवा मिठू मिठू करतो आहे. ईडी आणि सीबीआय या दोन्ही यंत्रणा मोदी यांच्या ढवळ्या आणि पवळ्यांप्रमाणेच काम करत आहेत.

भाजपाकडे भ्रष्टाचार धुण्याचं वॉशिंग मशीन

शिवसेनेतून फुटलेले पाच खासदार आणि नऊ आमदार असे आहेत की ते आधी सीबीआय आणि ईडीच्या हिटलिस्टवर होते. आता त्यांनी शिवसेना सोडताच सीबीआय, ईडीने त्यांना भाजपा वॉशिंग मशीनमध्ये टाकून एकदम पांढरेशुभ्र करून घेतले. जोपर्यंत भाजपाकडे भ्रष्टाचार धुऊन काढण्याची वॉशिंग मशीन आहे तोपर्यंत पंतप्रधानांनी भ्रष्टाचार मोडून काढू वगैरे भाषा न केलेलीच बरी. त्यात त्यांचेच हसे होत आहे.

उद्या ट्रम्पही भाजपात येतील

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणाचा सौदा करून न्याय विकला तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म? असे आज मोदींना आम्हाला विचारावेसे वाटते आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना अटक झाली आहे. उद्या मिस्टर ट्रम्पही भाजपात प्रवेश करतील त्यांचे सूटबूट भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ होतील. ईडी, सीबीआयने फक्त कपडे वाळत घालून त्यास कडक इस्त्री करण्याचे काम करावे. मोदींना नेमके हेच सांगायचे होते. संदेश स्पष्ट आहे. भ्रष्टाचारी फक्त भाजपातच राहतील आणि त्यांना अभय मिळेल असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे.