किल्ले प्रतापगड शिवभक्त व पर्यटकांसाठी आज पासून खुला करण्यात आला. अफजल खान कबरी वरील अतिक्रमण हटवण्याची मोहिम आठवड्या पासून सुरू होती. याकाळात किल्ले प्रतापगड पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता.आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर स्थानिकांच्या मागणीनुसार प्रतापगडावरील पर्यटन सर्वांसाठी खुले करण्यात आले.
अफजल खान कबरी वरील अतिक्रमण हटवण्याची मोहिम अचानक मागील आठवड्यात सुरू करण्यात आली.यासाठी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यासाठी परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला होता. यामुळे परिसरतील हालचालींवर मर्यादा आल्या होत्या.स्थानिक व पर्यटकांनाही प्रवेश बंदी होती. अचानक सर्व काही बंद झाल्याने स्थानिकांनचे प्रचंड हाल झाले. गडावरील सर्व उदरनिर्वाह हा फक्त पर्यटनावरच अवलंबून आहे. गडाच्या पायथ्याशी असलेले ८ ते १० गावांचा देखील रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे स्थानिकांनी पर्यटन सुरु करण्याची मागणी केली होती.त्यामुळे आज पासून शिवभक्त व पर्यटकांना गडावर प्रवेश देण्यात आला.
सातारा जिल्हा प्रशासनाच्या किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याच्या निर्णयाचे स्थानिकांना मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रतापगडावर होणाऱ्या सुधारणांमुळे येथे लाखो पर्यटक व शिवभक्त भेट देतील अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली